शासनाचा निषेध, फुकट दुध वाटणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

औरंगाबाद : शासनाने दुधाला जाहिर केलेली किमान आधारभूत दर सोसायटी, विविध दुध डेअरी व दुध संघ दुध उत्पादक शेतकऱ्यांना देत नासल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत आहे. शासन या विषयी कुठल्याच हालचाली करीत नसल्याने दुध उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात उतरले आहे.

कवडीमोल भावात दुध खरेदी घालण्यापेक्षा ते फूकटचं घालण्याचा ठराव दुध उत्पादकांनी घेतला आहे. तीन ते नऊ मे दरम्यान राज्यभरात विविध शासकीय कार्यालयात फुकट दुध वाटप करीत शासनाच्या धोरणाचा अहिंसात्मक मार्गाने निषेध करण्यात येणार आहे. अशी माहिती दुध उत्पादक शेतकऱ्यांनी "सकाळ'ला दिली. 

गेल्या सात ते आठ महिन्याभरपासून दुध उत्पादक शेतकऱ्यांना न परवडणारा दर मिळत आहे. शेतीचा जोडधंदा असलेल्या हा व्यवसाय या प्रकरामुळे कोलमडू पहात आहे. 

शासनाने दुधाला प्रतिलिटर 27 रूपये किमान आधारभूत किंमत जाहिर केली आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 15 ते 20 रूपयांचा दर मिळत आहे. यामूळे हा जोड धंदा शेतकऱ्यांना न परवडणारा झाला आहे. दुध प्रक्रीया करणारे चाळीस ते 50 रूपये लिटरने दुध विक्री करीत दुप्पट पैसा कमवित आहे. याधोरणा शासन कुठलीच भूमिका घेत नाही. यामूळे लाखगंगा (ता.वैजापूर) येथील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी 21 एप्रिला ग्रामसभा घेत जो पर्यंत शासनाने जाहिर केलेला हमीदर मिळत नाही तोपर्यंत दुध सोसायटी, दुध संघ आणि डेअरींना फुकट दुध घालण्याचा ठराव घेण्यात आला. 

येत्या 3 मे ला वैजापूर तालुका तहसील कार्यालयात सकाळी दोन तास फुकट दुध वाटप व गुलाब पुष्पाचे वाटप देत राज्यस्तरीय या आंदोलनास प्रारंभ होणार आहे. नऊ पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यातील दुध उत्पादक आपपाल्या जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात फुकट दुध वाटप करणार आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खान्देशातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार आहे. 

या आंदोलनास शेतकरी नेते डॉ. अजित नवले, धनंजय धोर्डे हे सहभाग आहे. अशी माहिती लाखगंगा गावचे सरपंच, डिगंबर तुरकणे,केशव मोरे, राजेंद्र तुरकणे, विलास मगरे, अण्णासाहेब मोरे, अभिजित पाटील, दत्तु खटाणे, गोकुळ कुणंजीर,एकनाथ ठोंबरे, देवनाथ पडोळ, दीपक गायकवाड,संभा डोके यांनी दिली. 

राज्यभरातील दुध उत्पदक शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेत शासनाचा अहिंसात्मक मार्गेने निषेध नोंदवावा. सर्व ग्रामपंचातीनी ग्रामसभेत लाखगंगाच्या ठरावा प्रमाणे ठरावा घ्यावा. 
- डिगंबर तुरकणे,सरपंच, लाखगंगा

Web Title: Farmers to give free milk in the protests against Government