Harshwardhan Sapkalsakal
महाराष्ट्र बातम्या
Harshwardhan Sapkal : शेतकरी अस्मानी संकटात, तातडीने मदत करा; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
ऐन मे महिन्यात अवकाळी पावसाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.
मुंबई - ऐन मे महिन्यात अवकाळी पावसाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. राज्यातील सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. काँग्रेसच्या टिळक भवन येथील मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली.