Farmers Long March : …तोपर्यंत लाँग मार्च मागे नाहीच; शेतकरी नेत्यांनी जाहीर केली भूमिका

farmers long march update jp gavit said march continued until Implementation of government orders
farmers long march update jp gavit said march continued until Implementation of government orders Sakal

शेतकरी, कष्टकरी, अंगणवाडी सेविका यांचा एक लाँगमार्च मुंबईच्या दिशेने येत आहे. त्यांच्या शिष्टमंडळाने नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आज सभागृहात बोलतांना मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य असल्याचं म्हटलं असून मार्च मागे घेण्याची विनंती केली

शेतकरी लाँग मार्च मागे घेण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना अवाहन केले होते. मात्र यानंतर देखील सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत लाँग मार्च मागे न घेण्याची भूमीका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे सोमवार पर्यंत लाँगमार्च वासिंदमध्येच मुक्कामी असणार आहे.

सरकारकडून निर्णयाची अमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतकरी मोर्चा मागे घेणार नाही अशी भूमिका शेतकर नेते जेपी गावीत यांनी घेतली आहे. यासोबतच सरकारने घेतलेले निर्णय समाधानकारक नसल्याचे देखील गावीत यावेळी म्हणाले आहेत.

farmers long march update jp gavit said march continued until Implementation of government orders
सरन्यायाधीश चंद्रचूड शिंदे गट-भाजपच्या 'ट्रोल आर्मी'च्या निशाण्यावर; विरोधकांचे राष्ट्रपतींना पत्र

मोर्चा संपलेला नाहीये. सरकारने दिलेले आदेश जोपर्यंत पाळले जात नाहीत. गावातील लोकांचे जोपर्यंत अमलबजावणी सुरू झाल्याचे निरोप जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत मोर्चा सुरूच राहणार असल्याचे शेतकरी नेते जेपी गावीत यांनी सांगितले.

कांदा पिकासाठी सरकारने अनुदान वाढवून ३५० रुपये केलं, तसेच अंगणवाडी, पोलिस पाटील, डाटा ऑपरेटर यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देऊन त्यांना पेन्शन योजना सुरू करावी अशी मागणी होती. त्यापैकी अंगणवाडीचे पैसे वाढवले, वृध्दापकाळाचे पैसे वाढवले, आम्ही फार समाधानी आहोत असे नाही असेही गावीत म्हणाले.

farmers long march update jp gavit said march continued until Implementation of government orders
Devendra Fadnavis : तुम्ही फडणवीसांबद्दल न बोललेलंच बरं; चित्रा वाघांचे ठाकरे गटाच्या खासदाराला चोख प्रत्युत्तर

शेतकऱ्यांचा मार्च ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे. शिष्टमंडळासमोब मुख्यमंत्र्यांनी चर्चादेखील केली. मुख्यमंत्री सभागृहात बोलतांना म्हणाले की, कांद्याला ३०० ऐवजी ३५० रुपये अनुदान देण्यात येईल. तसेच आंदोलकांच्या बहूतांश मागण्या मान्य आहेत. त्यामुळे गावित यांनी लाँग मार्च थांबवावा, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी केली होती.

तसेच, शेतकरी, कामगार, अंगणवाडी सेविका यांच्या मागण्यांसाबबत एक समिती गठीत करण्यात आलेली असून महिन्याभरात समितीने अहवाल द्यावा, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com