Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक आणि ST बसचा भीषण अपघात; 18 जखमी, एक प्रवासी गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक आणि ST बसचा भीषण अपघात; 18 जखमी, एक प्रवासी गंभीर

मुंबई गोवा महामार्गावर महाड शहराजवळ नाते खिंड याठिकाणी ST बस आणि कोळशाची वाहतुक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात बसचे फार मोठे नुकसान झाले आहे. तर बसच्या चालक वाहकासह 18 प्रवासी जखमी झाल्याची माहीती समोर आली आहे. (Latest News)

महाड शहराच्याजवळ नाते खिंड येथे हा अपघात झाला. या अपघातात ST बसच्या चालक वाहकासह 18 प्रवासी जखमी झाले असून एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या सर्व व्यक्तींवर महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचार सुरु आहेत.

मुंबई महाबळेश्वरवरुन ST बस महाडकडे येताना कोळशाची वाहतुक करणाऱ्या ट्रकची भीषण टक्कर होऊन हा अपघात झाला. या अपघतामध्ये ST बसचे फार मोठ्या प्रमाणत नुकसान झालं आहे. महाड शहर आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतुक सुरळीत सुरु आहे.

या अपघाताबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अपघातामध्ये चूक कोणाची हे अद्याप समोर आलेले नाही.

मुंबई-गोवा महामार्गावर 1 तासापासून मोठी वाहतूक कोंडी

पावसामुळे घाटातील वाहतूक देखील धोक्याची ठरत आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना आणि चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

अशात मुंबई गोवा महामार्गावरील गेल्या एक तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे. पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे भरावातील मातीचा चिखल रस्त्यावर आल्याने चिपळूणकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच परशुराम घाटाचा मार्ग देखील बंद करण्यात आला आहे. परशुराम घाटातील पर्यायी मार्ग म्हणून चाकरमान्यांनी चिरणी आंबडस मार्ग वापरावा असं आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे चिरणी आंबडस मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

टॅग्स :accidentaccident case