‘सरकारनामा’तून राजकीय नजराणा

‘सरकारनामा’तून राजकीय नजराणा

पुणे - राजकीय घडामोडींची पडद्यावरील आणि त्यामागची बित्तंबातमी देणाऱ्या ‘सरकारनामा’ या वेबपोर्टलचा पहिला छापील दिवाळी अंक बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे. भविष्यकालीन घडामोडींचा वेध घेण्यासह राज्याच्या राजकारणात घडून गेलेल्या वेधक प्रसंगांच्या अनुभवांचा नजराणा वाचकांना मिळणार आहे.

सुजाण आणि राजकीय विचारशक्ती जागृत असलेल्या मराठी वाचकांसाठी ‘सरकारनामा’ ही यंदाची आगळी भेट आहे. राजकीय कोलाहलातून नेमके काय आणि कसे निवडायचे, याची मांडणी ‘सरकारनामा’च्या दिवाळी अंकामध्ये आहे. 

‘सरकारनामा’चा हा अंक तुम्ही सहज घरपोच मागवू शकता. त्यासाठी ॲमेझॉनवर प्रकाशनपूर्ण नोंदणीसाठी सवलतीच्या रात उपलब्ध आहे. तेव्हा त्वरा करा आणि आपली मागणी आजच नोंदवा. 

दिवाळी अंकाची वैशिष्ट्ये
महासर्वेक्षण : आज निवडणूक झाली तर? 
कोण ठरणार हुकूमाचा एक्का- २०१९ ला कोणाची भूमिका ठरणार निर्णायक? 
महाराष्ट्राच्या उद्याच्या राजकारणातील प्रभावी तरुण चेहऱ्यांची ओळख.
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती : मुख्यमंत्रिपदावर असताना ते काय शिकले? सहभाग- शरद पवार, मनोहर जोशी, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस
चुरशीच्या लढती- राज्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक अटीतटीची होणार?
थोडक्‍यात राजकारणाविषयी सबकुछ माहिती करून घ्यायची असेल तर हा अंक संग्रही हवाच.

अधिक माहितीसाठी
९१३०० ८८४५९  किंवा
webeditor@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com