Maharashtra News : राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी काका कोयटे

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी पुन्हा ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची एकमताने निवड झाली.
Kaka Koyate
Kaka KoyateSakal
Summary

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी पुन्हा ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची एकमताने निवड झाली.

पुणे - महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी पुन्हा ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची एकमताने निवड झाली. पुण्यात मंगळवारी झालेल्या नवीन संचालकांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. त्यात काका कोयटे (अहमदनगर) यांची अध्यक्षपदी, अ‍ॅड. दीपक पटवर्धन (रत्नागिरी) यांची कार्याध्यक्षपदी, शशिकांत राजोबा (सांगली) यांची महासचिवपदी, वसंतराव शिंदे (मुंबई) व डॉ. शांतिलाल सिंगी (औरंगाबाद) यांची उपाध्यक्षपदी, दादाराव तुपकर (जालना) यांची खजिनदारपदी, सुरेश पाटील (रायगड), अ‍ॅड. अंजली पाटील (नाशिक), चंद्रकांत वंजारी (ठाणे) व नारायण वाजे (नाशिक) यांची उपकार्याध्यक्षपदी, भारती मुथा (पुणे), शरद जाधव (पालघर), जवाहर छाबडा (कोल्हापूर) व भास्कर बांगर (पुणे) यांची सहसचिवपदी, तर राजुदास जाधव (यवतमाळ) यांची समन्वयकपदी निवड करण्यात आली.

उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी, फेडरेशनचे संचालक राधेश्याम चांडक (बुलडाणा), धनंजय तांबेकर (नांदेड), रवींद्र भोसले (सातारा), वासुदेव काळे (अहमदनगर), सुभाष आकरे (गोंदिया), नीलिमा बावणे (नागपूर), मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, पत्रकार भालचंद्र कुलकर्णी उपस्थित होते.

कोयटे यांनी फेडरेशनवर १९९० सालापासून संचालक, सहसचिव, महासचिव या पदांवर काम केले असून, गेली १४ वर्षे ते अध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी फेडरेशनचा राज्यभर विस्तार करीत पतसंस्थांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. फेडरेशनने शिर्डी येथे बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या सहकार्याने स्वत:चे अद्ययावत शिक्षण केंद्रही उभारले आहे.

राज्यभरातील पतसंस्थांनी पुन्हा एकदा अध्यक्षपदी होण्याचा बहुमान दिल्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. ही निवड होण्यात सर्व नवीन संचालकांबरोबरच सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी यांचेही सहकार्य लाभले. यापुढील काळात प्राप्तिकर खात्याकडून येणाऱ्या नोटिसांबद्दलही मार्चअखेरपर्यंत दिलासादायक निर्णय घेण्याचा प्रयत्न आहे.

- काका कोयटे, नवनियुक्त अध्यक्ष, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com