उत्सवांसाठी रस्त्यांवर मंडपांना मनाई करावी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

मुंबई - सार्वजनिक उत्सवांसाठी रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मंडप बांधण्यास मुंबई आणि ठाणे महापालिकेने मनाई करावी, अशी मागणी "ऍलर्ट सिटिझन्स फोरम ऑफ इंडिया‘च्या वतीने दोन्ही महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. 

रस्त्यांऐवजी खुल्या मैदानांमध्ये आणि महापालिका शाळांमध्ये उत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे. धार्मिक सण साजरे करताना ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक नियम पाळण्याचे आणि वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशी यंत्रणा उभारण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील महापालिकांना दिले आहेत. सध्या या प्रकरणी उच्च न्यायालयात निकाल वाचनाचे काम सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबई-ठाण्यातील रस्त्यांवर वाहतुकीला अडसर ठरणारे मंडप उभारण्यास पालिका आयुक्तांनी परवानगी देऊ नये, अशी मागणी संस्थेने केली आहे. दरम्यान, ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक नियमांची चोख अंमलबजावणी पोलिस आणि पालिकेने करावी. त्यासाठी ध्वनिमापक यंत्रे पोलिसांना द्यावीत, असे आदेश उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिले आहेत.

Web Title: Festival festivities to be celebrated in the streets,