जमा नोटांचा अंतिम आकडा लवकरच 

पीटीआय
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

मुंबई - पाचशे व हजारच्या रद्द झालेल्या नोटा बॅंका आणि टपाल कार्यालयांमध्ये नेमक्‍या किती जमा झाल्या, हे अद्याप स्पष्ट झाले नसून संपूर्ण मोजदाद झाल्यानंतर लवकरच ही आकडेवारी जाहीर करण्यात येईल, असा खुलासा रिझर्व्ह बॅंकेने गुरुवारी केला. 

मुंबई - पाचशे व हजारच्या रद्द झालेल्या नोटा बॅंका आणि टपाल कार्यालयांमध्ये नेमक्‍या किती जमा झाल्या, हे अद्याप स्पष्ट झाले नसून संपूर्ण मोजदाद झाल्यानंतर लवकरच ही आकडेवारी जाहीर करण्यात येईल, असा खुलासा रिझर्व्ह बॅंकेने गुरुवारी केला. 

पाचशे व हजारच्या रद्द झालेल्या नोटांपैकी 95 टक्के नोटा 30 डिसेंबरपर्यंत बॅंकांमध्ये जमा झाल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर खुलासा करताना रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे, की रद्द नोटा जमा झाल्याची वेगवेगळी आकडेवारी काही घटकांकडून दिली जात आहे. देशभरातील बॅंकांकडे जमा झालेल्या नोटांचे तपशील पाहून मगच रिझर्व्ह बॅंक अंतिम आकडेवारी जाहीर करेल. आधी असलेली जमा आणि नंतर जमा झालेल्या नोटा यांचा ताळेबंद तपासण्यात येणार आहे. यामुळे दोन वेळा नोटा मोजल्या जाण्याची त्रुटी राहण्याची शक्‍यता कमी आहे. रद्द झालेल्या नोटांपैकी एकूण रिझर्व्ह बॅंकेकडे जमा झालेल्या नोटांची आकडेवारी लवकरात लवकर जाहीर करण्यात येणार आहे. 

नोटाबंदीच्या अखेरच्या दिवशी रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना पाचशे व हजारच्या रद्द नोटा किती जमा झाल्या, याचा तपशील कामकाज संपल्यानंतर त्याच दिवशी सादर करण्यास सांगितले होते. सरकारने 9 नोव्हेंबरपासून पाचशे व हजारच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्या. या नोटा एकूण 15.44 लाख कोटी रुपयांच्या असून, एकूण चलन वितरणात त्यांचे प्रमाण 86 टक्के होते. यातील 15 लाख कोटी रुपयांच्या रद्द नोटा रिझर्व्ह बॅंकेकडे 50 दिवसांच्या नोटाबंदीच्या कालावधीत परत आल्याचे समजते.

Web Title: The final figure will soon deposit old notes