
Santosh Deshmukh Case: मंत्रिपदाचा राजीनामा देऊनही धनंजय मुंडेंच्या अडचणी थांबायचं नाव घेत नाहीयेत. त्यातच त्यांना सहआरोपी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. धनंजय मुंडे यांनीच आरोपींना पोसलं, गुन्हा केल्यानंतर फरार होण्यास मदत केली आणि पैसे पुरवले; असा थेट आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. तर देशमुख कुटुंबियांनी नाव न घेता मुंडेंवर कारवाईची मागणी केलीय.