Nupur Sharma : भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांवर मुंबईत गुन्हा दाखल

BJP Spokesperson Nupur Sharma
BJP Spokesperson Nupur Sharmaesakal
Summary

'इस्लामिक कट्टरपंथीयांकडून सोशल मीडियावर मला सतत बलात्काराच्या धमक्या येत आहेत.'

मुंबई : राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरील टिप्पण्यांमुळं एका विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्याबद्दल भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्याविरुद्ध IPC चे कलम 295A (धार्मिक भावना दुखावणं), 153A (दंगली भडकवण्याचा प्रयत्न) आणि 505B (जनतेत भीती निर्माण करणं) अंतर्गत मुंबईत एफआयआर दाखल झालाय. एएनआय या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिलीय. भारतीय सुन्नी मुस्लिमांची संघटना (Indian Sunni Muslim Association) असलेल्या रझा अकादमीच्या (Raza Academy) तक्रारीवरून भाजप नेत्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. टीव्हीवरील चर्चेदरम्यान एका विशिष्ट धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भाजप नेत्यावर ही कारवाई करण्यात आलीय.

या संदर्भात भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी सांगितलं की, ज्ञानवापी प्रकरणातील एका टीव्ही चर्चेचा संपादित व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर, मला इस्लामिक कट्टरपंथीयांकडून सोशल मीडियावर (Social media) सतत बलात्काराच्या धमक्या येत आहेत, असा आरोप त्यांनी केलाय. नुपूर शर्मा यांनी 2015 ची दिल्ली विधानसभा निवडणूक आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढवली होती. ABVP उमेदवार म्हणून त्या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाही होत्या.

BJP Spokesperson Nupur Sharma
'त्यांचं' अंतर्वस्त्र भगवं झालंय; न्यायमूर्तींबाबत PFI नेत्याचं वादग्रस्त विधान

नुपूर शर्मा या दिल्ली भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या सदस्या, तसेच पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत. याशिवाय, त्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या (BJYM) मुख्य चेहरा देखील आहेत. राष्ट्रीय प्रवक्त्या असल्यानं त्या दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांमध्ये भाजपची बाजू घेतात. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या हिंदू कॉलेज, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, यूके इथं शिकलेल्या नुपूर ह्या व्यवसायानं वकील आहेच. त्यांनी कायद्याची पदव्युत्तर पदवी घेतलीय. ज्ञानवापी मशीद वादावरून नुपूर शर्मा एका टेलिव्हिजन वृत्तवाहिनीच्या चर्चेत पोहोचली होती. यानंतर सोशल मीडियावर हिंदू धर्माची सातत्यानं खिल्ली उडवली जात आहे, असा त्यांचा आरोप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com