गुन्ह्याची कुंडली एका क्‍लिकवर होणार उपलब्ध 

सिद्धेश्‍वर डुकरे
शनिवार, 5 मे 2018

मुंबई - एफआयआर दाखल झाल्यानंतर शिक्षा जाहीर होऊन कारागृहात गुन्हेगाराची रवानगी होण्यापर्यंतची सर्व माहिती लवरकच एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे. यासाठी सीआयडीच्या अतिरिक्‍त महासंचालकाची एक समिती नेमली असून, सर्व यंत्रणांना एकत्र जोडण्याचा गृह विभागाचा प्रयत्न आहे. 

राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांत "ऑनलाइन' पद्धतीने एफआयआर नोंदणीला सुरवात झाली आहे. यापुढील टप्प्यात गृह खात्याने "गुन्हेगारीविषयक अंतर्गत न्याय प्रणाली' नावाची यंत्रणा विकसित करण्याचा विडा उचलला आहे. यासाठी केंद्र सरकारची आर्थिक मदत होणार आहे. या न्याय प्रणाली यंत्रणेत राज्यातील न्यायालये, कारागृहे, अंगुली मुद्रा विभाग (फिंगर प्रिंटिंग), न्यायवैद्यक प्रयोगशाळा, सरकारी वकील कार्यालये आणि राज्यातील पोलिस ठाणी यांना जोडले जाणार आहे. या सर्व यंत्रणांची एकाच नेटवर्कमध्ये जोडणी झाल्यानंतर कोणत्याही टप्प्यावरील संबंधित गुन्ह्याची माहिती केव्हाही कोणत्याही यंत्रणेला एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे एखाद्या गुन्ह्याचा तपास कोणत्या टप्प्यावर आहे हे समजणार आहे. तसेच प्रत्येक विभागाने तयार केलेल्या अहवालात फेरफार करता येणार नाही. 

आकडेवारी 
- राज्यातील पोलिस ठाण्याची संख्या- 1116 
- राज्यात असलेली एकूण वरिष्ठ पोलिस कार्यालये- 629 
-ऑनलाइन एफआयआर दाखल झालेली मार्च 2018 अखेरपर्यंतची संख्या- 18,578 
- पोलिस प्रशासनाने डिजिटायझेशन केलेले दस्तावेज- 2 कोटी 50 लाख 

Web Title: FIR lodged with online method in police stations