
Kolhapur Violence : संदीप देशपांडेंसह ८ जणांविरुद्ध FIR दाखल; कोल्हापुरातील राडा राजकारण्यांना भोवणार?
मनसे नेते संदीप देशपांडे आणि इतर 8 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात कोल्हापूरातील राडा राजकारण्यांना भोवणार अशी चर्चा सुरु आहे. (FIR registered against MNS leader Sandeep Deshpande and 8 others Violence in Kolhapur over Whatsapp messages)
संदीप देशपांडे आणि इतर 8 जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37, 135 अन्वये कोल्हापुरात झालेल्या निदर्शनेनंतर औरंगजेबाच्या पुतळ्याचे दहन केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

कोल्हापूर आणि अहमदनगर येथे औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून मोठा वाद उफाळला. या संपूर्ण प्रकाराचा निषेधार्थ दादर येथील शिवाजी पार्कात मनसेने बुधवारी (७ जून) आंदोलन केले. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क येथे औरंगजेबाचा पुतळा जाळला.(Latest Marathi News)
औरंगजेबाचे स्टेटस ठेवून त्याचे उदात्तीकरण केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले होते. शहराच्या अनेक भागांत दगडफेक, तोडफोडीने दंगल उसळली होती. त्यात दोनशेवर वाहने, दुकाने, टपर्या, घरांचे नुकसान झाले. पोलिसांनी जमावाला नियंत्रणाखाली आणण्यासाठी वारंवार लाठीमार केला. (Latest Marathi News)
जमाव नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांना अश्रुधुराच्या ३० पेक्षा अधिक नळकांड्या फोडाव्या लागल्या. सुमारे तीन तासांनी दंगल नियंत्रणात आली. दगडफेक, तोडफोडप्रकरणी ५० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे; तर दगडफेक, तोडफोडीत पोलिसांसह ६० जण जखमी झाले. दंगल लक्षात घेऊन प्रशासनाने गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत इंटरनेट सेवा खंडित केली.