गीतांजली एक्‍स्प्रेसच्या डब्याला आग 

 Gitanjali Express
Gitanjali Express

जळगाव : शिरसोलीकडून जळगावकडे येणाऱ्या गीतांजली एक्‍स्प्रेसच्या जनरेटरच्या डब्याला सोमवारी दुपारी 12 च्या दरम्यान अचानक आग लागली. शिरसोली रेल्वेस्थानकावरून गाडी निघाल्यानंतर डब्यातून धूर निघत असल्याचे गार्डच्या लक्षात आले. त्याने तत्काळ साखळी ओढून गाडी रेल्वेस्थानकावर थांबविली. त्यानंतर रेल्वेची अग्निशमन यंत्रणा व बंबांच्या साहाय्याने आग विझविण्यात आली. धावत्या रेल्वेला आग लागल्यानंतर काही मिनिटे प्रवाशांनी "द बर्निंग ट्रेन'चा थरार अनुभवला.

शिरसोली रेल्वेस्थानक सोडल्यानंतर गाडीतील गार्ड हरिलाल ब्रह्मा यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तत्काळ साखळी खेचून गाडी रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर थांबविली. लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसह त्यांनी आग लागलेला डबा एक्‍स्प्रेसपासून वेगळा केला. गाडीतील अग्निशमन यंत्रणेचे सुमारे बारा सिलिंडर, महापालिका, जैन इरिगेशनचा एक अशा दोन बंबांनी पाण्याचा मारा केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यानंतर या डब्याला नवीन इंजिन लावून सुमारे दुपारी पावणेचारच्या सुमारास जळगाव रेल्वेस्थानकावर आणण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com