एसटीमधून प्रथमोपचार पेट्या गायब

एसटीमधून प्रथमोपचार पेट्या गायब

मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या १८ हजार बसमधून प्रथमोपचार पेट्या गायब झाल्या आहेत. त्यामुळे गरज भासल्यास प्रवासी व कर्मचाऱ्यांवर प्रथमोपचार करणे अशक्‍य झाले आहे. 

प्रवाशांना विविध सोई-सुविधा दिल्याचा दावा एसटी महामंडळाकडून केला जातो; मात्र बसगाड्यांतील प्रथमोपचार पेट्या गायब झाल्या आहेत. चालक, वाहक व प्रवाशांसाठी बसगाड्यांत बसवलेल्या प्रथमोपचार पेट्यांत बॅण्डेज, मलम, आयोडिन, चिकटपट्ट्या, औषधी गोळ्या, कात्री आदी साहित्य ठेवले जात होते. त्याची चोरी होत असल्याने प्रथमोपचार पेटीची जबाबदारी वाहकाकडे देण्यात आली होती; परंतु त्या गायब झाल्या आहेत. प्रथमोपचार पेट्यांबाबतच्या समस्येकडे एसटीने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे; परंतु सामान्य प्रवाशांची दखल घेतली जात नाही, असा आरोप होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com