Vidhan Sabha 2019 : बिगुल वाजलं ! 'या' तारखेला जाहीर होणार काँग्रेसची पहिली यादी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली असून काँग्रेसने जोरदार तयारी चालू केली असल्याचे समजत आहे. काँग्रेस 05 सप्टेंबर रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली असून काँग्रेसने जोरदार तयारी चालू केली असल्याचे समजत आहे. काँग्रेस 05 सप्टेंबर रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि देशात झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर करण्यात तरी आघाडी दाखवल्याचे यातून दिसून येत आहे. काँग्रेसने राष्ट्रावदी काँग्रेस पक्षासोबत आघाडी केली असून विधानसभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस 125-125 जागा लढणार आहे तर, मित्रपक्षांसाठी ते 38 जागा सोडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करून आपण आघाडी करण्यास तयार आहोत पण, प्रकाश आंबेडकरांचीच तयारी नसल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. विजय वडेट्टीवार हे आज हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First list of Congress to be announced on 5th October