पाणी आरक्षणासाठी देशातील पहिले फोन आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

सोलापूर - टाटा व कोयना धरणातील हक्काच्या पाण्यासाठी 28 जानेवारी रोजी दुपारी चार वाजल्यापासून राज्यातील हजारो नागरीक मुख्यमंत्री आणि सचिवांना तसेच त्यांच्या कार्यालयात फोन करणार आहेत, अशी माहिती किसान व वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कदम म्हणाले, "28 जानेवारी 2019 रोजी दुपारी चार वाजता जवळा (ता. सांगोला) येथून गावातील एका शेतकऱ्याचा पहिला फोन मुख्यमंत्र्यांना जाईल व तेथून आंदोलनास सुरवात होईल. मागण्या मान्य होईपर्यंत हे फोन आंदोलन सुरू राहणार आहे. या दरम्यान गावांतून, तसेच
विविध शहरांतून सभा आणि बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.''

Web Title: first phone agitation for Water Reservation