सोलापूरमध्ये पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

सोलापूर - कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गुलबर्गा येथील रुग्णावर शुक्रवारी पहाटे मूत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. पुणे येथून ब्रेनडेड रुग्णाची मूत्रपिंड आणली होती. सोलापूर जिल्ह्यातील ही पहिलीच प्रत्यारोपण शस्त्रक्रिया असल्याचे अधिष्ठाता महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. माधवी रायते यांनी सांगितले. सिंधुदुर्गचा एक विवाहित युवक पुण्यात झालेल्या रेल्वे अपघातात गंभीर जखमी झाला होता. तो ब्रेनडेड झाल्याने त्याच्या नातेवाइकांना वैद्यकीय पथकाने या युवकाचे अवयवदान करता येतील हे पटवून दिले.

सोलापूर - कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गुलबर्गा येथील रुग्णावर शुक्रवारी पहाटे मूत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. पुणे येथून ब्रेनडेड रुग्णाची मूत्रपिंड आणली होती. सोलापूर जिल्ह्यातील ही पहिलीच प्रत्यारोपण शस्त्रक्रिया असल्याचे अधिष्ठाता महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. माधवी रायते यांनी सांगितले. सिंधुदुर्गचा एक विवाहित युवक पुण्यात झालेल्या रेल्वे अपघातात गंभीर जखमी झाला होता. तो ब्रेनडेड झाल्याने त्याच्या नातेवाइकांना वैद्यकीय पथकाने या युवकाचे अवयवदान करता येतील हे पटवून दिले. पत्नी आणि नातेवाइकाने सहमती दर्शविल्यावर वैद्यकीय यंत्रणा कामाला लागली. 

पुण्याच्या ससून रुग्णालयात अवयव काढून शासकीय नियमानुसार जिथे गरज आहे, तिथे संबंधित रुग्णांना पोचविण्यात आले. "अश्‍विनी'तील रुग्णासाठी शुक्रवारी पहाटे अडीच वाजता हे पथक सोलापूरकडे रवाना झाले. ते पहाटे साडेपाच वाजता रुग्णालयात पोचले. सकाळी नऊ वाजेपर्यंत प्रत्योरोपणाची शस्त्रक्रिया सुरू होती, असेही डॉ. रायते म्हणाल्या.

Web Title: The first successful kidney transplant in Solapur