पहिली ते बारावी पाठ्यपुस्तके विक्रीसाठी उपलब्ध

राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तसेच पुस्तक विक्रेते यांनन इयत्ता पहिली ते बारावीची पाठ्यपुस्तके मंडळाच्या भांडारांतून खरेदी करून शाळेमध्ये, दुकानांमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
Book Shop
Book ShopSakal

पुणे - राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तसेच पुस्तक (Book) विक्रेते यांनन इयत्ता पहिली (First) ते बारावीची (HSC) पाठ्यपुस्तके मंडळाच्या भांडारांतून खरेदी करून शाळेमध्ये, दुकानांमध्ये विद्यार्थ्यांसाठी (Student) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनाही पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्यासाठी बालभारतीच्या सर्व विभागीय भांडारांत किरकोळ विक्री सुरू असल्याची माहिती बालभारतीचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली. (First to 12th Standard Book Available for Selling)

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळामार्फत( बालभारती ) राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध माध्यमांची पाठ्यपुस्तके तयार करण्यात येतात. ही सर्व पाठ्यपुस्तके बालभारतीच्या विभागीय भांडारात खुल्या विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता सर्व वर्गांच्या सर्व माध्यमांची पाठ्यपुस्तके मंडळाच्या मुंबई (गोरेगाव), पनवेल, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर व कोल्हापूर या ९ विभागीय भांडांरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Book Shop
पुण्यात वेगवेगळ्या भागात कालव्यात मंगळवारी आढळले तीन मृतदेह

मोफत ऑनलाईन उपलब्ध

संपूर्ण राज्यामध्ये कोरोनामुळे नियमित व्यवहार बंद असून काही शहरांतील दुकाने अद्याप सुरू झालेली नाहीत. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यामुळे सर्व पाठ्यपुस्तके मंडळाच्या "www.ebalbharati.in" या संकेस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असून विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी सर्व पाठ्यपुस्तके मंडळाच्या वेबसाईटवरून विनामूल्य डाऊनलोड करण्याची सुविधा मंडळामार्फत सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

या माध्यमांची पाठ्यपुस्तके उपलब्ध

- पहिली ते आठवी : १० माध्यम (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी, तेलुगु, तमिळ व बंगाली)

- नववी आणि दहावी : ८ माध्यम (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी व तेलुगु)

- अकरावी आणि बारावी : विज्ञान शाखा (इंग्रजी माध्यम), वाणिज्य व कला शाखा - २ माध्यम (मराठी व इंग्रजी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com