"वैद्यकीय'च्या प्रथम वर्षातच "कम्युनिकेशन स्किल'चे धडे 

"वैद्यकीय'च्या प्रथम वर्षातच "कम्युनिकेशन स्किल'चे धडे 

जळगाव - वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षात पुस्तकी ज्ञानातून ओळख दिली जात होती. प्रत्यक्ष रुग्णाची तपासणी किंवा त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी दुसऱ्या वर्षातील प्रवेशानंतरच संधी मिळत होती. परंतु, या वर्षापासून "वैद्यकीय'च्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून, प्रवेश घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी विद्यार्थ्यांना रुग्णांशी संवाद साधून त्यांची तपासणी करता येणार आहे. हा निर्णय देशातील सर्व शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी लागू करण्यात आला आहे. 

वैद्यकीय शिक्षणाचे प्रवेश व अभ्यासक्रमाची रचना ठरविण्याचे काम मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय)मार्फत करण्यात येत होती. मात्र, वैद्यकीय शिक्षणाच्या "गव्हर्निंग'मध्ये बदल होऊन "बोर्ड ऑफ गव्हर्नमेंट'ची (बीओजी) स्थापना करण्यात आली आहे. अधिकारात बदल झाल्याबरोबर "बीओजी'ने एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना "सर्वांसाठी आरोग्य' हे आपल्यासाठी महत्त्वाचे मानून सामाजिक दायित्व कळावे, या उद्देशाने अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे "एमबीबीएस'चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षात "थिअरी'सोबत "प्रॅक्‍टिकली' ज्ञान शिकण्यास मिळणार आहे. 

पाच उद्दिष्टांसाठी बदल 
"बीओजी'ने एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात यंदापासून बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रमातील केलेला बदल हा पाच उद्दिष्टांसाठी केला आहे. यात प्रामुख्याने प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना फाउंडेशन कोर्स; यात ज्ञान आणि "कम्युनिकेशन स्किल' शिकविले जाणार आहे. रुग्णांशी संवाद, आजाराची ओळख याचे शिक्षण, "इंटिग्रेटेड टीचिंग अँड लर्निंग' यात विद्यार्थ्यांना थिअरी आणि प्रॅक्‍टिकल या दोघांचा मेळ घातला जाईल. "स्किल डेव्हलपमेंट अँड लर्निंग', "इलेक्‍टिव्ह' यामध्ये विद्यार्थ्यांना पर्याय उपलब्ध खुले केले जातील. 

दोन महिने कोर्स 
वैद्यकीय शिक्षणात एमबीबीएसला प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना आतापर्यंत पहिल्या वर्षात थिअरीचे ज्ञान दिले जात होते. यानंतर त्या थिअरीच्या आधारावर प्रॅक्‍टिकली ज्ञान दुसऱ्या वर्षी सुरू केले जात होते. परंतु, अभ्यासक्रमातील बदलानुसार "एमबीबीएस'च्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षात थिअरी प्रॅक्‍टिकल ज्ञान देण्याचे निश्‍चित केले आहे. यामध्ये पहिले दोन महिने विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंट, रुग्ण पासणी, रुग्णाच्या नातेवाइकांशी संवाद, आजारांची तपासणी याचे ज्ञान दिले जाणार आहे. 

"बोर्ड ऑफ गव्हर्निंगने यंदापासून एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात बदल सुचविले असून, त्यानुसार प्रथम वर्षातच विद्यार्थ्यांना थिअरी प्रॅक्‍टिकली ज्ञान घेता येणार आहे.' 
- डॉ. भास्कर खैरे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com