मासे खाणारांसाठी चिंतेची बाब; मासे होणार कायमचे हद्दपार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 जुलै 2019

तुम्ही अस्सल मासेखाऊ आहात आणि ताटात मासा नसेल तर तुमचं पोट भरत नसेल तर तुमच्यासाठी ही चिंतेची बाब आहे. यापुढे तुम्हाला पापलेट, बोंबील केवळ स्वप्नातच पाहावे लागणारेत.

पुणे : तुम्ही अस्सल मासेखाऊ आहात आणि ताटात मासा नसेल तर तुमचं पोट भरत नसेल तर तुमच्यासाठी ही चिंतेची बाब आहे. यापुढे तुम्हाला पापलेट, बोंबील केवळ स्वप्नातच पाहावे लागणारेत. कारण, येत्या काळात मत्स्यप्रेमींचे हे लाडके मासेच समुद्रातून कायमचे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जातेय. हे मासे समुद्रातून वेगानं नाहीसे होतायत...त्याचाच परिणाम म्हणून मासेमारांच्या जाळ्यात ते सापडेनासे झालेत. त्यांचं उत्पन्न प्रचंड घटलंय. 

मत्स्यसंवर्धनासाठी प्रजनन काळात मासेमारीवर बंदी असते. मात्र, या काळात ट्रॉलर आणि पर्ससीन पद्धतीनं मासेमारी केली जाते. त्यांच्या जाळ्यात पापलेटची पिल्लं, लहान बोंबील सापडतात आणि त्यांचीच विक्री बाजारात केली जाते. मात्र, या मासेमारीमुळे माशांच्या प्रजननावर परिणाम होतोय.

महाराष्ट्रात 1 जून ते 31 जुलै या काळात राज्याच्या सागरी हद्दीत मासेमारीवर बंदी असते. नारळीपौर्णिमेंनंतर मासेमारीला सुरुवात होते. मात्र, मासेमारीच्या पहिल्या हंगामात लहान पापलेट बोंबीलची बारीक जाळ्यानं मासेमारी केली जाते. त्यामुळे भविष्यात हे मासे पाहायला मिळणार नाहीत, अशी भीती व्यक्त केली जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fish production will reduced