esakal | सोलापुरातील पाच जणांचा मृत्यू, 84 नवे कोरोनाबाधित 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

या भागातील पाच जणांचा मृत्यू 
सोलापुरातील निराळे वस्ती मुरारजी पेठ येथील 80 वर्षिय पुरुष, वी. एम. सोसायटी परिसरातील 76 वर्षिय पुरुष, अभिषेक नगर पुना नाका परिसरातील 51 वर्षीय महिला, रेल्वे लाईन परिसरातील 41 वर्षिय पुरुष आणि काजल नगर परिसरातील 65 वर्षिय पुरुष अशा पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. 

सोलापुरातील पाच जणांचा मृत्यू, 84 नवे कोरोनाबाधित 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीत आज 84 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. महापालिका हद्दीतील 76 जण आज कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोना चाचणीचे 439 आव्हाल अद्यापही प्रलंबित असल्याने कोरोनाच्या प्रादुर्भावाची चिंता अद्यापही कायम आहे. 

कल्याण नगर होटगी रोड, विद्यानगर शेळगी, ओम नमः शिवायनगर होटगी रोड, स्वामी विवेकानंदनगर होटगी रोड, चंदननगर जुळे सोलापूर, मुरारजी पेठ, लक्ष्मीनगर होटगी रोड, मल्लिकार्जुननगर कुमठा नाका, त्रिमुर्तीनगर मजरेवाडी, कोणार्कनगर, एन. जी. मिल चाळ, नामदेवनगर भवानी पेठ, उत्तर कसबा, भवानी पेठ, दत्तनगर, गोकुळनगर, बॉइज्‌ होस्टेल, शास्त्रीनगर, बुधवार पेठ, भद्रावती पेठ, शेळगी, विद्यानगर जुना एम्प्लॉयमेंट चौक, सुमंगल सोसायटी, वडारगल्ली, हराळेनगर, काडादी चाळ, दिलीपनगर कुमठे गाव, कमलानगर, नेहरुनगर, 2 नंबर झोपडपट्टी विजापूर नाका, लक्ष्मीनगर अशोक चौक, फॉरेस्ट, भवानी पेठ, मोहम्मदिया मशिद जवळ, रेल्वे लाईन्स, हत्तुरे वस्ती, काडादीनगर होटगी रोड, शुक्रवार पेठ, विद्यानगर, मोहितेनगर होटगी रोड, कोणार्कनगर, उजनीनगर, आशियानानगर जुळे सोलापूर, गोकुळनगर जुळे सोलापूर, दाजी पेठ, मार्कंडेय रुग्णालय, विशाल नगर जुळे सोलापूर, आशा नगर, मित्र नगर शेळगी, वेदांत नगर अक्कलकोट रोड, इंद्रधनु विष्णू मिल कंपाऊंड, जवाहर सोसायटी, रविवार पेठ, विडी घरकुल, मोदीखाना, म्हाडा कॉलनी जुळे सोलापूर, माजी सैनिक नगर, दक्षिण कसबा या भागात आज नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.