एसटीत 14 हजार पदांसाठी पाच लाख उमेदवारांचे अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) 14 हजार पदांकरिता चार लाख 97 हजार 753 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात लिपिक-टंकलेखकपदांसाठी सर्वाधिक म्हणजे एक लाख 75 हजार 695 अर्ज आले आहेत. 

महामंडळाने जानेवारीत विविध पदांकरिता अर्ज मागवले होते. अर्ज भरण्याच्या 11 फेब्रुवारी या शेवटच्या तारखेपर्यंत महामंडळाकडे चार लाख 97 हजार 753 इतके विक्रमी अर्ज आले आहेत, तर आगरोधकपदांसाठी सर्वांत कमी तीन हजार 973 अर्ज आले आहेत. चालक तथा वाहकपदांसाठी 68 हजार 835 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात 433 महिलांनीही अर्ज केले आहेत. या भरती प्रक्रियेत चालक तथा वाहक व सहायक (मेकॅनिक) या पदांची लेखी परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार आहे आणि लिपिक-टंकलेखक व इतर पर्यवेक्षकपदांची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. उमेदवारांच्या भरती अर्जांमध्ये काही त्रुटी राहिल्या असल्यास त्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत त्या दूर करता येतील. मार्च-एप्रिलमध्ये विविध पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. 

Web Title: five lac candidates apply for 14 thousand post