‘पीएच.डी.’ प्रवेशासाठी पाच टक्के गुणांची सवलत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पुणे - पीएच. डी. आणि एम. फिल अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्णतेच्या पात्रतेत अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि इतर मागास प्रवर्ग तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना आता तब्बल पाच टक्के गुणांची सवलत मिळणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतेच यासंदर्भातील परिपत्रक काढले आहे. त्यामुळे प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या सवलतीचा फायदा होऊ शकणार आहे.

या नव्या निर्णयामुळे प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांसाठी गुणांची पात्रता आता ५० टक्‍क्‍यांहून ४५ टक्के झाली आहे. 

प्रवेश प्रक्रियेत राखीव जागांवर पुरेसे उमेदवार उपलब्ध नसल्याने या जागा रिक्त राहण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया संपल्यावरही एका महिन्याच्या आत प्रवेशासाठी विशेष मोहीम आखण्याची सूचनाही आयोगाने दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘पेट’ प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा मिळेल. राखीव प्रवर्गाच्या अधिकाधिक जागांवर प्रवेश होण्यासाठी पावले उचलण्याची आवश्‍यकता असल्याचे आयोगाने परिपत्रकात नमूद केले आहे.

पीएच. डी. आणि एम. फिल अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचा कट ऑफ अधिक गुणांचा असल्यामुळे अनेक उमेदवार पात्र ठरत नाहीत. परंतु विद्यापीठ अनुदान आयोगाने ५ टक्के गुणांची सवलत दिल्याने अनेकांना संधी मिळू शकणार आहे.
- अतुल पाटील, समन्वयक, महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना

Web Title: five percentage marks concession for PH.D Admission