विधान परिषदेच्या पाच जागांसाठी चुरस 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

मुंबई - विधान परिषदेच्या पाच जागांसाठी उद्या (ता. 3) ला राज्यात मतदान होत आहे. यात, नागपूर, कोकण, औरंगाबाद या शिक्षक मतदारसंघात, तर नाशिक-नगर व अमरावती या पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीविरुद्ध भाजप-शिवसेना अशी चुरस आहे. उद्या होणाऱ्या निवडणुकीत राज्यमंत्री रणजित पाटील विरुद्ध कॉंग्रेसचे संजय खोडके यांच्यात पदवीधर मतदारसंघासाठी लक्षवेधी लढत आहे, तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार विक्रम काळे यांचे पारडे जड मानले जात आहे. नाशिक नगर पदवीधरमध्ये कॉंग्रेसचे विद्यमान आमदार डॉ.

मुंबई - विधान परिषदेच्या पाच जागांसाठी उद्या (ता. 3) ला राज्यात मतदान होत आहे. यात, नागपूर, कोकण, औरंगाबाद या शिक्षक मतदारसंघात, तर नाशिक-नगर व अमरावती या पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीविरुद्ध भाजप-शिवसेना अशी चुरस आहे. उद्या होणाऱ्या निवडणुकीत राज्यमंत्री रणजित पाटील विरुद्ध कॉंग्रेसचे संजय खोडके यांच्यात पदवीधर मतदारसंघासाठी लक्षवेधी लढत आहे, तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार विक्रम काळे यांचे पारडे जड मानले जात आहे. नाशिक नगर पदवीधरमध्ये कॉंग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे पुन्हा एकदा मैदानात असून, राष्ट्रवादीचा त्यांना पठिंबा आहे; तर कोकण शिक्षक मतदासंघात शेकापचे बाळाराम पाटील कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उभे आहेत. येथे लोकभारतीचे बेलसरे यांचे आव्हान समोर आहे. नागपूरमध्येही कॉंग्रेसविरुद्ध भाजप असा सरळ सामना रंगणार आहे. 

Web Title: Five seats in the Legislative Council of the competition