विधान परिषदेच्या पाच जागांसाठी तीन फेब्रुवारीला मतदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

मुंबई - महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी तीन फेब्रुवारीला मतदान होणार आहे. औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागातील शिक्षक मतदारसंघांच्या आणि अमरावती व नाशिक विभागातील पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी हे मतदान होईल. 

या पाचही जागांवरील उमेदवारांचा कार्यकाल पाच डिसेंबरला संपला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दहा जानेवारीला सुरूवात होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 जानेवारी आहे. 18 जानेवारीला अर्जांची छाननी होईल. 20 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारीची मुदत आहे. तीन फेब्रुवारीला सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होईल. सहा फेब्रुवारीला मतमोजणी होईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (बुधवार) जाहीर केले. निवडणूक होत असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आजच आचारसंहिता लागू झाली आहे. 

निवडणूक होत असलेले मतदारसंघ आणि तेथील मुदत संपलेले सदस्य असेः
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघः विक्रम काळे
नागपूर शिक्षक मतदारसंघः नागो गाणार
कोकण शिक्षक मतदारसंघः रामनाथ मोते
अमरावती पदवीधर मतदारसंघः रणजीत पाटील
नाशिक पदवीधर मतदारसंघः सुधीर तांबे

Web Title: Five seats of the Legislative Council to voting on 3 feb