पूरग्रस्तांसाठी भाजप कमी पडणार नाही; फडणवीस यांची ग्वाही

पूरग्रस्तांसाठी भाजप कमी पडणार नाही; फडणवीस यांची ग्वाही
ANI
Summary

पूरग्रस्त लोकासांठी भाजपकडून मदत पाठवण्यात येत आहे. मदतीचे साहित्य घेऊन भाजपचे ट्रक कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात रवाना झाले.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना भाजपकडून सर्वतोपरी मदत केली जात असून राज्याच्या विविध भागांतून २० ते २५ ट्रक मदत सामग्री पूरग्रस्त भागांत पाठविली जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीत भाजप कमी पडणार नाही, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

भाजपा प्रदेश कार्यालयात फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांच्यातर्फे पूरग्रस्तांसाठीचे मदत साहित्य रवाना करण्यात आले. या प्रसंगी फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, पूरग्रस्त भागासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. भाजप कार्यकर्ते पूरग्रस्तांच्या मदतीत काहीही कमी पडू देणार नाहीत. कृपाशंकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे मदत साहित्य पाठविले आहे. भांडी कुंडी, अन्न पदार्थ , चटया, कपडे, पिण्याचे पाणी याबरोबरच सायकलीही पाठवण्यात आल्या आहेत.

पूरग्रस्तांसाठी भाजप कमी पडणार नाही; फडणवीस यांची ग्वाही
कृष्णा वळेल; पण महापूर हटेल?

दरम्यान, शुक्रवारी देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी मुख्यमंत्रीसुद्धा कोल्हापुरात होते. आजी माजी मुख्यमंत्री आमने सामने आले होते. त्यांनी या भेटीवेळी पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना करायला हव्यात यावर चर्चा झाल्याचं सांगितलं. तसंच मुख्यमंत्री लवकरच यासाठी बैठक बोलावणार असून आम्हीही त्यात सहभागी होऊ अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com