Mumbai News : अंडरवेअरमध्ये सापडलं ४.५ किलो सोनं ! ३९ वर्षाच्या बिहारी इसमाची करामत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold News

Mumbai News : अंडरवेअरमध्ये सापडलं ४.५ किलो सोनं ! ३९ वर्षाच्या बिहारी इसमाची करामत

मुंबईः दुबईवरुन परतणाऱ्या एका ३९ वर्षीय इसमाकडे विमानतळावर तब्बल ४.५ किलो सोनं आढळलं आहे. या महाभागाने अंडरवेअरमध्ये हे सोनं लपवलं होतं. मुंबई विमानतळावर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं.

सदरील बिहारी तरुणाने दुबईवरुन आणलेल्या साडेचार किलो सोन्याची किंमत २.३ कोटी रुपये इतकी आहे. त्याने त्याच्या जीन्सच्या आतमध्ये पॉकेट बनवून त्यात सोने लपवले होते. शिवाय अंडरवेअरमध्येही सोनं दडवलं होतं. बुधवारी मुंबई एअरपोर्टवर त्याला ताब्यात घेण्यात आलं.

प्रवाशांच्या डिजिटल प्रोफाईलिंगच्या आधारे एअर इंटेलिजन्स युनिटने बिहारमधील सिवान येथे राहणाऱ्या जमीउला अहमद याला ताब्यात घेतलं आहे. अहमद हा दुबईवरुन मस्कतमार्गे परतत असतांना मुंबई एअरपोर्टवर त्याला पकडण्यात आलेलं आहे.

त्याच्याकडून ४ किलो ६५० ग्रॅम वजनाचं सोनं जप्त करण्यात आलं. अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली असता आपण फक्त डिलिव्हरी करत असल्याचं त्याने स्पष्ट केलं.

या ३९ वर्षांच्या तस्कराने अंडरवेअरमध्ये सोनं लपवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यापूर्वीदेखील तस्करांकडून नाना तऱ्हेच्या क्लृप्त्या करुन सोनं आणि इतर अमली पदार्थ भारतात आणतांना पकडलेले आहेत.

टॅग्स :goldMumbai Airport