‘चारा छावण्या भाजप-शिवसेनेसाठी ‘कुरण’

Ashok-Chavan
Ashok-Chavan

मुंबई - महाराष्ट्र भीषण दुष्काळाच्या संकटात असताना जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आयते कुरण उलपब्ध करून देण्यात आले आहे. या कार्यकर्त्यांनी जनावरांची बोगस संख्या दाखवून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले. सरकारचे अनुदान लाटणाऱ्या या घोटाळेबाजांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

राज्यातील चारा छावण्यांच्या गैरव्यवहारावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, ‘‘मराठवाड्यात शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या स्वयंसेवी संस्था दाखवून मोठ्या प्रमाणावर चारा छावण्या सुरू केल्या व त्यातून कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटले. चारा छावण्यांमधून जनावरांची संख्या जास्त दाखवून मलिदा लाटण्यात आला. बीड जिल्हाधिकाऱ्यांनी चारा छावण्यांची तपासणी केली असता या छावण्यांमध्ये प्रत्यक्षात कमी जनावरे दिसून आली, मात्र अनुदान जास्त जनावरांचे लाटण्यात आले आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com