चारा छावण्या सुरूच राहणार - चंद्रकांत पाटील

Fodder-Depo
Fodder-Depo

मुंबई - राज्यात जूनच्या मध्यापर्यंत पावसाला सुरवात होण्याची शक्‍यता असली तरी पुरेसे पाणी तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावणी व टॅंकर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण उपाय योजनांसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

दुष्काळ निवारणासंदर्भातील उपाय योजना सुचविण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सहकारमंत्री सुभाष पाटील, पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल, कृषी सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी आतापर्यंत केलेल्या उपाय योजनांचा आढावा पाटील यांनी घेतला.

पाटील म्हणाले, की सध्या राज्यात १,५८३ छावण्या सुरू असून त्यामध्ये लहान व मोठी अशी एकूण १० लाख ६८ हजार ३७५ जनावरे आहेत. चारा छावण्यांसाठी औरंगाबाद विभागाला १३५.१८ कोटी, पुणे विभागासाठी ५.०७ कोटी, नाशिक विभागासाठी ४७ कोटी, पशुसंवर्धन विभागाला १३.८१ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. तसेच, चारा छावणीसाठी आगाऊ रक्कम देण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

सध्या राज्यातील ४,९२० गावे व १० हजार ५०६ वाड्यांमध्ये ६२०९ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. राज्यात १७ जूनपर्यंत पावसाला सुरवात होण्याचा अंदाज आहे. दुष्काळी निधीचे वाटपही सुरू असून आतापर्यंत ६७ लाख ४७ हजार ८३५ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत ४,४१९ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. रोजगार हमी योजनेची ३८ हजार ८११ कामे सुरू असून त्यावर तीन लाख ७७ हजार ३२८ मजूर उपस्थित आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com