भोजन व्यवस्था विद्यार्थ्यांच्या हाती 

दीपा कदम
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

मुंबई - आदिवासी वसतिगृहांतील मुलांची भोजनाची व्यवस्था मुलांच्या हातीच सोपविण्यास आदिवासी विभाग तयार झाले आहे. ज्या वसतिगृहातील 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मुले एकत्रित येऊन भोजन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यास तयार असतील, अशा वसतिगृहात मुलांना बाहेरून पुरवठादाराकडून जेवण किंवा डबा बनवून घेता येणार आहे. मात्र, प्रत्येक विद्यार्थ्यामागे भोजनासाठी मिळणारा निधी हा त्याच मुलाच्या खात्यामध्ये जमा (डीबीटी) केला जाणार असून, त्यामध्ये मात्र आदिवासी विभाग कोणतीही तडजोड करण्यास तयार नाही. 

आदिवासी वसतिगृहातील मुलांसाठी सुरू असणारी भोजन व्यवस्था बंद करून मुलांच्या खात्यात (डीबीटी) पैसे जमा केले जात आहेत. काही वसतिगृहांतील विद्यार्थ्यांनी भोजनाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवल्याने राज्य सरकारने हा पर्याय मान्य करण्याची तयारी दाखवली आहे. राज्य सरकार लवकरच याबाबतचे निर्देश देणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसतिगृहांतील एकूण विद्यार्थ्यांपैकी 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन सामूहिक मेस सुरू करण्याचे ठरविल्यास किंवा एकाच ठेकेदाराकडून डबा मागविण्याचे ठरविल्यास विद्यार्थ्यांच्या भोजन समितीच्या निरीक्षणाखाली ती सुरू करता येणार आहे. ही भोजन व्यवस्थापन समिती चर्चा करून नाश्‍ता, दुपार व रात्रीचे जेवण व त्याकरिता मेन्यू निश्‍चित करेल. 

अशी असेल व्यवस्था 
- विद्यार्थी प्रतिनिधी आणि वसतिगृहाचे गृहपाल समितीचे सदस्य 
- निविदा, जाहिरातीसाठी गृहपालांची मदत 
- पुरवठादार किंवा घरपोच जेवण पुरवणाऱ्याची निवड समिती करणार 

जेवणासाठी कूपन 
विद्यार्थ्यांना बॅंक खात्यात जमा झालेल्या पैशांतून मेसमधील जेवण मिळणार आहे. त्यासाठी कूपनचा पर्यायही सुचविण्यात आला आहे. एक महिन्याचे कूपन विद्यार्थ्यांनी खरेदी करायचे आहेत. या कूपनचा हिशेब क्रमांकासह नोंदवहीमध्ये ठेवावा अशीही अट घालण्यात आली आहे. तसेच, मेसमधील 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भोजन व्यवस्थापन समितीला लेखी स्वरूपात कारणे देऊन भोजन पुरवठादार बदलण्याची मागणी केल्यास एक महिना आगावू नोटीस देऊन पुरवठादार बदलता येणार आहे. 

Web Title: Food arrangements in the hands of students

टॅग्स