मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या मुद्यावरून राज्य सरकारचे घूमजाव 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

राज्याच्या पोलिस महासंचालकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.  महाराष्ट्र पोलिस अॅक्टनुसार सिनेमागृहात खाद्यपदार्थ चढ दरात विकल्याबद्दल कारवाई करण्याची कोणतीही तरतूद नाही अशी माहिती त्यांनी न्यायालयात दिली. मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती कमी होण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेने खळ्ळखट्याक आंदोलन केले होते.

मुंबई : मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थ्यांच्या मुद्यावरून राज्य सरकारने घूमजाव केले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बाहेरील खाद्यपदार्थांवरील बंदी कायम ठेवत अशी परवानगी दिल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भूमिका पोलिस महासंचालकांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली.  

राज्याच्या पोलिस महासंचालकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.  महाराष्ट्र पोलिस अॅक्टनुसार सिनेमागृहात खाद्यपदार्थ चढ दरात विकल्याबद्दल कारवाई करण्याची कोणतीही तरतूद नाही अशी माहिती त्यांनी न्यायालयात दिली. मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती कमी होण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेने खळ्ळखट्याक आंदोलन केले होते.

त्यानंतर प्रेक्षकांना 1 ऑगस्टपासून मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येतील, असं सरकारने गेल्याच आठवड्यात स्पष्ट केले होते. सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु या भूमिकेतून त्यांनी माघार घेतली आहे.

Web Title: food in multiplex state government u turn