भिडे यांच्या दाव्याची वनमंत्र्यांकडूनही खिल्ली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

मुंबई : "माझ्या शेतातील आंबे खाल्ल्यानंतर नवविवाहित जोडप्यांना मुले होतात,' अशी मुक्‍ताफळे उधळल्याने सोशल मीडियात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्याबाबत संतापाची लाट आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह विविध क्षेत्रांतील नागरिकांना संभाजी भिडे यांच्या या वक्‍तव्याचा खरपूस समाचार घेत टीकेची झोड उठली आहे. 

याबाबत अर्थमंत्री व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही संभाजी भिडे यांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. "भिडे सांगतात त्या प्रकारच्या जातीचा आंबा राज्यातील कोणत्याही वनपरिक्षेत्रात असल्याची कोणतीही माहिती नाही. किंबहुना अशा प्रकारच्या आंब्याचे संशोधन झाल्याचेही ऐकिवात नाही,' अशा शब्दात मुनगंटीवार यांनी संभाजी भिडेंचा दावा टोलावून लावला आहे. 

दरम्यान, माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असा अजब दावा भिडे यांनी नाशिकमध्ये एका कार्यक्रमादरम्यान केला. आजपर्यंत 180 जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून, त्यापैकी दीडशे जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे, असा दावाही त्यांनी केला. 

Web Title: forest minister makes fun on sambhaji bhide