फडणवीस आक्रमक; पहिल्याच दिवशी ट्विट करत सोडले ठाकरे सरकारवर बाण...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

ठाकरे सरकारवर टीका करून फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता म्हणून लगेचच ठाकरे सरकारला घेरण्याची तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे. ‬

मुंबई ः गुरुवारी सांयकाळी  उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि महाराष्ट्रात नव्या राजकीय पर्वाला सुरूवात झाली. उद्धव यांनी शपथ घेतल्यानंतर काही तासांमध्येच कॅबिनेटची बैठक घेतली. याच बैठकीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरती टीका केली आहे.  

त्यांनी केलेल्या व्टिटमध्ये ते म्हणाले की, ''काल झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपून-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली.'' 

मग बहुमताचे दावे कशासाठी- फडणवीस यांनी अनेक प्रश्न देखील यावेळी उपस्थित केले आहेत, ‪या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? ‬नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी? ‬ ‪स्वतच्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का? ‬ अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का?‬ ‪भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का?  अशा प्रकारचे सवाल फडणवीस यांनी केले.‬

दरम्यान, अशा प्रकारची टीका करून फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता म्हणून लगेचच ठाकरे सरकारला घेरण्याची तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे. ‬

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former chief minister Fadnavis criticize the Thackeray government