शिवसेना थेट विरोधात लढली असती तर आम्हालाच... : फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन अनैसर्गिक युती केली आहे. भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेलो. जनतेने आम्हाला पूर्ण बहुमत दिले. महायुतीचे सरकार यायला हवे होते. निकाल लागल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सांगितले, की आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत. याचे मला आश्चर्य वाटले.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने अनेक बंडखोरांना मदत केली. त्यांनी भाजप उमेदवाराविरोधात उमेदवार दिले. पुण्यात दोन ठिकाणी पराभव झाले, तेथे शिवसेनेने विरोधी पक्षांना मदत केली. पण, आम्ही सतत त्यांच्यासोबत राहिले. शिवसेनेने जनादेशाचा विश्वासघात केला असून, शिवसेना थेट विरोधात लढली असती तर आम्हालाच फायदा झाला असता, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. अवघे 80 तास मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर राजीनामा द्यावा लागला होता. आता विरोधी पक्षनेते असलेल्या फडणवीस यांनी लोकसत्ता डॉट कॉमला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या सत्तानाट्याविषयी वक्तव्ये केली आहेत. तीन पायांचे सरकार कधीच जास्त काळ चालू शकत नाही. 

नाथाभाऊंची अवहेलना आम्हाला आवडली नाही : बाळासाहेब थोरात

फडणवीस म्हणाले, की शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन अनैसर्गिक युती केली आहे. भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेलो. जनतेने आम्हाला पूर्ण बहुमत दिले. महायुतीचे सरकार यायला हवे होते. निकाल लागल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सांगितले, की आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत. याचे मला आश्चर्य वाटले. मोदी आमचे नेते आहेत, असे तुम्ही प्रचारांत सांगितले आणि निकालानंतर भाषा बदलली. हे आधीच ठरल्यासारखे दिसत होते. अडीच वर्षे शब्द दिल्याचा मुद्दा ते पकडून बसले. यावर चर्चा करू असे मी त्यांना म्हणत होतो. पण, त्यांनी चर्चेची तयारी दाखविली नाही. गेल्या पाच वर्षांत मी उद्धवजींचा एकही शब्द पडू दिला नाही. मात्र, नंतर ते माझ्याशी एक शब्दही बोलले नाहीत, माझे निरोपही घेतले नाही. भाजपला बाजूला ठेवण्याची मानसिकता त्यांनी बनविली होती. चर्चा न करण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी जनतेला सांगितले नव्हते, की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करू. भाजप रस्त्यावर पडलेला पक्ष नाही, त्यामुळे केंद्रीय मंत्री फोन करतील आणि शिवसेनेशी चर्चा करतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former CM Devendra Fadnavis says if Shivsena fight against BJP in oppose benefit to BJP