महाराष्ट्रातल्या उपमुख्यमंत्रिपदाचा विचित्र योगायोग; इतिहास काय सांगतो?

टीम ईसकाळ
Friday, 22 November 2019

या सत्तासंघर्षात उपमुख्यमंत्रीपद आणि इतर मंत्रीपद वाटपांचा कमी विचार होताना दिसतोय. पण तुम्हाला माहितीय का, महाराष्ट्राला उपमुख्यमंत्रीपदाचा एक वेगळाच इतिहास आहे. काय आहे तो? जाणून घेऊ.

मुंबई : सध्या महाराष्ट्रात फक्त एकच चर्चा आहे...सत्तास्थापन कधी होणार आणि मुख्यमंत्री कोणाचा होणारा? या प्रश्नाने राज्यातील जनताच गोंधळून गेली आहे. विविध पक्षांच्या बैठकांवर बैठका, भेटींवर भेटी होत असूनही मुख्यमंत्रीपदावर काही शिक्कामोर्तब होत नाहीये. मग, उपमुख्यमंत्रीपदाची बातच दूर! सध्या सगळ्यांना फक्त मुख्यमंत्रीपद आणि सत्तास्थापनेसाठी बहुमत सिद्ध करायचंय. या सगळ्यांत उपमुख्यमंत्रीपद आणि इतर मंत्रीपद वाटपांचा कमी विचार होताना दिसतोय. पण तुम्हाला माहितीय का, महाराष्ट्राला उपमुख्यमंत्रीपदाचा एक वेगळाच इतिहास आहे. काय आहे तो? जाणून घेऊ.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्राचा आजपर्यंत जो उपमुख्यमंत्री झालाय तो कधीच मुख्यमंत्री होऊ शकला नाही, असा महाराष्ट्रातल्या उपमुख्यमंत्रीपदाचा इतिहास आहे. ज्या मोठ-मोठ्या नेत्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषविले ते कधी मुख्यमंत्री होऊ शकले नाही. काही जण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत उतरलेच नाही, तर काही जणांना या शर्यतीत उतरूनही मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळविण्यात अपयश आलं. यात अनेक चांगले राजकारणी मुख्यमंत्रीपदाला मुकले, का तर ते फक्त उपमुख्यमंत्री होते म्हणून! 

या उपमुख्यमंत्र्याना होता आले नाही मुख्यमंत्री!

 NASHIKRAO TIRPUDE
नाशिकराव तिरपुडे

ramrao adik
रामराव आदिक

gopinath munde
गोपीनाथ मुंडे

Related image
छगन भुजबळ

RR Patil
आर. आर. पाटील

AJIT PAWAR
अजित पवार 

या 'दोन' शिवसेना नेत्यांपैकी होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री!

वरील सर्व उपमुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्री होण्याची क्षमता होती, मात्र त्यांना उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावे लागले. अजित पवारांना हा इतिहास बदलण्याची संधी आली होती. मात्र निवडणूकांनंतर सत्तासमीकरणेच बदलल्याने त्यांची संधी हुकली. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले, महाविकासआघाडी तयार झाली. अजित पवारांच्या समर्थकांनी जल्लोषाची तयारीही केली होती, मात्र महाविकासआघाडीत दुय्यम भूमिका स्वीकारून शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा, असा निर्णय झाल्याने त्यांचा नाईलाज झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former deputy cm couldnt make it for cm post in Maharashtra