माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे निधन

विजय बोऱ्हाडे
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

माजी मंत्री तथा सिन्नरचे माजी आमदार तुकाराम सखाराम दिघोळे (वय 77) यांचे आज पहाटे दिडच्या सुमारास निधन झाले. गेल्या दोन
महिन्यांपासून नाशिकच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

सिन्नर : माजी मंत्री तथा सिन्नरचे माजी आमदार तुकाराम सखाराम दिघोळे (वय 77) यांचे आज पहाटे दिडच्या सुमारास निधन झाले. गेल्या दोन
महिन्यांपासून नाशिकच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

सिन्नर तालुक्यातील जायगाव येथली ते भूमिपुत्र म्हणून त्यांची ओळख होती.
सिन्नर तालुक्याच्या राजकारणात त्यांचे अढळ स्थान होते. 1985 ते 1999
पर्यंत सलग 15 वर्ष ते सिन्नरचे आमदार राहीले. युती शासनाच्या काळात 1995 ते 1999 या काळात उर्जा राज्यमंत्री म्हणून त्यांनी मंत्रीपद भूषविले.
जिल्हा बॅंकेचे संचालक, उर्जा, ग्रामविकास मंत्री, राज्य सहकारी बॅंकेचे
विभागीय अध्यक्ष, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, नाशिक सहकारी
साखर कारखान्याचे अध्यध्य अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी लिलया पार
पाडल्या.

शरद पवार यांच्या एस काॅंग्रेस, पुलोदच्या काळात ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर सलग तीनवेळा ते सिन्नरचे आमदार होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा अभिजीत, विवाहीत मुलगी असा परिवार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former minister Tukaram Dighole Passed away