Vidya Chavan | राष्ट्रवादीकडून नव्या महिला प्रदेशाध्यक्षाची घोषणा, विद्या चव्हाणांकडे सूत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vidya chavan

राष्ट्रवादीकडून नव्या महिला प्रदेशाध्यक्षाची घोषणा, विद्या चव्हाणांकडे सूत्र

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची वर्णी लागली आहे. रुपाली चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर महिला प्रदेशाध्यक्षपद खाली होतं. आज राष्ट्रवादी महिला राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांच्या उपस्थित पत्रकार परिषदेत संबंधित घोषणा झाली आहे. (NCP Woman State President)

रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्या नंतर रिक्त जागेवर विद्या चव्हाण यांची वर्णी लागली. चाकणकर यांच्याकडे राज्य महिला आयोगाचा कार्यभार देण्यात आला होता. हे पद दोन वर्षांपासून रिक्त होते. (Vidya Chavan appointed as a NCP woman president)

हेही वाचा: Koregaon Bhima Violence : शरद पवारांना तिसरं समन्स, आज नोंदवणार साक्ष

प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती झाल्यानंतर विद्या चव्हाण यांनी देशातील महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होत असल्याचं म्हटलं. महागाई प्रचंड वाढत आहे. आम्ही यावर सतत्याने आवाज उठवणार आहोत, असं त्यांनी म्हटलं. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रवादीत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

नागपूर विभागीय अध्यक्ष - शाहीन हकीम

अमरावती विभागीय अध्यक्ष - वर्षा निकम

पुणे विभागीय अध्यक्ष - विशाली नागवडे

पश्चिम महराष्ट्र विभागीय अध्यक्ष - कविता म्हेत्रे

उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष - अनिता परदेशी

मराठवाडा विभागीय अध्यक्ष

औरंगाबाद - शादिया शेख

लातूर - वैशाली मोते

Web Title: Former Mla Vidya Chavan Declared As A Woman State President Of Ncp After Rupali Chakankar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NCP
go to top