छोटा पेंग्विन खूश असेल: नीलेश राणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

मुंबईः मुंबई नाइट लाइफची मागणी पूर्ण झाल्याने छोटा पेंग्विन खूश असेल, असे ट्विट महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी केले आहे.

मुंबईः मुंबई नाइट लाइफची मागणी पूर्ण झाल्याने छोटा पेंग्विन खूश असेल, असे ट्विट महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी केले आहे.

नीलेश राणे आनंद दिघे यांच्या मृत्यूसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांचे पुतळेही जाळले होते. नीलेश राणे यांनीही शिवसेनेला लक्ष्य केले आहे. या घडामोडी ताज्या असतानाच नीलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले. त्यांनी ट्विटमध्ये थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेतलेले नाही. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारसंदर्भात दिलेल्या निर्णयाचा दाखला त्यांनी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने डान्सबार संदर्भातील जाचक अटीही शिथील केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ट्विटमध्ये नीलेश राणे यांनी म्हटले आहे की, 'छोटा पेंग्विन खूश असेल, त्याच्या मुंबई नाइट लाइफची मागणी त्याने देवाकडे इतकी मनापासून केली की डान्स बार चालू झाले.'

दरम्यान, नीलेश राणे यांनी आणखी एका ट्विटमध्ये बेस्ट संपावरुन शिवसेनेचे प्रवक्ते अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेवरही टीका केली आहे. 'स्क्रिप्ट लिहायचे काम संजय राऊत यांचे आहे. स्वतःकडून प्रश्न सुटत नाही आणि दुसऱ्याने सोडवले की सहन होत नाही. ह्या स्वभावाला चिंधीगिरी म्हणतात, असे नीलेश राणे यांनी म्हटले आहे. शशांक राव यांचे स्क्रिप्ट दुसऱ्याने लिहिले होते, असा आरोप अनिल परब यांनी केला होता. यावर नीलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले.

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईत नाइट लाइफला परवानगी मिळावी, यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांचे ट्विट आहे.

Web Title: former mp nilesh rane controversial tweet on dancebar slams aditya thackeray