ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू प्रो.राम ताकवले यांचे निधन Prof. Ram Takawale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ram takawle

Prof. Ram Takawale : ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू प्रो.राम ताकवले यांचे निधन

ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व राष्ट्रसेवा दल व समाजवादी विचारसरणीचे विचारवंत प्रो. राम ताकवले यांचे आज निधन झाले.

मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, सोबतच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले होते. महाराष्ट्र ज्ञानमंडळाची स्थापना (एमकेसीएल)झाली त्यामध्ये संस्थापक संचालक म्हणून त्यांनी भूमिका बजावली होती.

त्यांनी शिक्षकांसाठी बॅचलर ऑफ एज्युकेशन, मुक्त शिक्षण स्त्रोत निर्मिती आदी विविध प्रकारचे साहित्य लेखन केले होते. दूर व मुक्त शिक्षणात त्यांचे भरीव काम होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कॉमन वेल्थ ऑफ लर्निंग हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. तसेच राष्ट्रीय स्तरावर देखील अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.

मुक्त विद्यापीठानंतर 1996 ते 1998 या काळात त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू पदाची जबाबदारी ही सांभाळली होती त्या ठिकाणी त्यांनी प्राध्यापकांना स्वातंत्र्य देऊन समाजाभिमुख शिक्षणक्रम साठी भरीव योगदान दिले होते.