हायकोर्टात सोनई हत्याकांडातील चार आरोपींना फाशी कायम

four accused got death sentence in sonai honor killing case ahmednagar
four accused got death sentence in sonai honor killing case ahmednagar

मुंबई :  नगर जिल्ह्यातील सोनई हत्याकांड प्रकरणातील चारही आरोपींना मुंबई हायकोर्टाने फाशीची शिक्षा केली कायम ठेवली आहे. यातील एका आरोपीची फ़ाशी रद्द करण्यात आली आहे. आरोपींपैकी रमेश दरंदले, प्रवीण दरंदले, प्रकाश दरंदले, संदीप कुरे, यांची फाशी कायम ठेवण्यात आली. तर, अशोक नवगरे याची फाशी रद्द करण्यात आली आहे. 

सत्र न्यायालयाचा निकाल काय?
नगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी दलित खून खटल्यातील सहाही आरोपींना येथील विशेष व अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्रकुमार वैष्णव यांनी फाशीची शिक्षा सुनावली होती. सोनई येथे सचिन घारू (वय 23), संदीप राज धनवार (वय 24), राहुल ऊर्फ तीलक राजू कंडारे (वय 24) या तरुणांची प्रेम प्रकरणातून 1 जानेवारी 2013 रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

काय घडलं होतं सोनईत?
नेवासा फाटा येथील घाडगे-पाटील महाविद्यालयात शिकणाऱ्या एका मुलीशी सचिन घारू या मेहतर समाजाच्या मुलाचे प्रेमसंबंध होते. दोघे पळून जाऊन लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे निदर्शनास आले होते. नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये सचिन घारू (वय 23), संदीप राज धनवार (वय 24) आणि राहुल राजू कंडारे (वय 24) हे युवक कामाला होते. मुलीचे प्रेमप्रकरण गावकऱ्यांसह इतरांच्या लक्षात आल्याने मुलीच्या कुटुंबीयांपैकी प्रकाश दरंदले यांनी त्याचा काटा काढण्याचा बेत रचला. एक जानेवारी 2011 रोजी मुलीच्या घरच्यांनी या तिघांना त्यांच्या गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथील स्वच्छतागृहाची टाकी साफ करावयाची असल्याचे सांगून बोलावले. त्यात आरोपी प्रकाश विश्‍वनाथ दरंगले, रमेश विश्‍वनाथ दरंदले, पोपट विश्‍वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक रोहिदास दरंदले, अशोक नवगिरे, संदीप माधव कुऱ्हे या सात जणांचा समावेश होता. आरोपींनी संदीप धनवार आणि राहुल कंडारे यांचा हत्याराने खून करून त्यांचे मृतदेह पोपट दरंदले यांच्या कोरड्या विहिरीत पुरले. सचिन घारू याचे मुंडके व हातपाय वैरण तोडण्याच्या मोठ्या अडकित्त्यात टाकून त्याचे आठ तुकडे करून कूपनलिकेत टाकून दिले. सचिनची आई कलाबाई घारू यांनी या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com