एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

मुंबई : वांद्रे पूर्वेतील सरकारी वसाहतीत राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांनी झुरळ मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केली. आर्थिक चणचणीमुळे आत्महत्या करीत असल्याचे घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत लिहिले आहे. खेरवाडी पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. 

राजेश तुळशीराम भिंगारे (वय 45), त्यांची पत्नी अश्‍विनी (42), मुलगा गौरांग (19) आणि तुषार (23) अशी मृतांची नावे आहेत. राजेश हे शिधावाटप कार्यालयात शिपाई होते. आर्थिक चणचणीमुळे आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. भिंगारे कुटुंब वांद्रे पूर्वेतील सरकारी इमारत क्रमांक दोनमधील खोली क्रमांक 210 मध्ये राहायचे. शनिवारी बराच वेळ झाला तरी भिंगारे यांनी दरवाजा न उघडल्यामुळे अखेर शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता चौघेही बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तत्काळ लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्‍टरांनी वैद्यकीय तपासणी करून चौघांनाही मृत घोषित केले. 

दरम्यान, कफ परेड येथे शुक्रवारी (ता. 23) एकाच कुटुंबातील तिघांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर दोन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. 

Web Title: Four Family member committed Suicide