राज्यात चार हजार महिला लैंगिक अत्याचाराच्या बळी

women
women

पुणे : राज्यात गेल्या सहा वर्षांत चार हजार महिला व सात हजार बालकांवर लैंगिक अत्याचार झाले आहेत. तर २५ महिलांवर अॅसिड हल्ला झाल्याची माहिती महिला व बाल विकास आयुक्तालयात नोंद करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई उपनगरात सर्वांधिक १०१३ महिला लैंगिक अत्याचाराच्या बळी पडल्या आहेत. 

बलात्कार व बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी ‘मनोधैर्य’ योजना सुरू झाली. सुरवातीला महिला व बाल विकास आयुक्तालय तर २०१८ नंतर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडे पुनर्वसनाची जबाबदारी आली. पीडित महिला व बालकांना प्रतिष्ठा व आत्मविश्‍वास परत मिळवून देण्यासाठी, त्यांना शारीरिक आणि मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्याचप्रमाणे अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकांस त्यांचा चेहरा विद्रुप झाल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास प्रत्येकी दहा लाख रूपये अर्थसहाय्य दिले जाते.’’

मनोधैर्य योजने अंतर्गत गेल्या सहा वर्षांत सात हजारापेक्षा अधिक पीडित बालके तर चार हजार महिला पीडित आहेत. यापैकी पावणे तीन हजार महिला तर साडेपाच हजार बालकांना प्रत्येकी दहा लाख रूपयांची मदत देण्यात आली आहे. यामध्ये एकुण मिळणाऱ्या अर्थसाह्याच्या पंचाहत्तर टक्के रकम ही पीडितांच्या नावे बँकेत ठेव म्हणून ठेवण्यात आली असून पंचवीस टक्के रकम धनादेशाव्दारे त्यांना दिले आहे. रकमेवरील व्याज बँकेमार्फत पिडीत किंवा त्यांच्या पालकांच्या बचत खात्यात दरमहा जमा करण्यात येते, अशी माहिती महिला व बाल विकास उपायुक्त भ.ल. मुंडे यांनी दिली. 

पीडित महिलांच्या नावे तत्काळ बँकेत खाते 
‘मनोधैर्य’ योजना २०१८ नंतर महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाकडे देण्यात आले आहे. पीडिताचे प्रकरण येताच विधी सेवा प्राधिकरण संबंधिताचे आधारकार्ड व पॅनकार्डच्या माध्यमातून बँकेत खाते उघडते. त्यामुळे पीडित देशभरात कोठेही स्थायीक झाल्यास व निकाल लागताच ‘मनोधैर्य’ योजनेतील पैसे त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतात.

जिल्हा लैगिंक अत्याचाराची संख्या 
पुणे - २३४
सातारा - २०५
सांगली - ११५
सोलापूर - २३४
कोल्हापूर - १५२
मुंबई - २५५
मुंबई उपनगर - १०१३
ठाणे - ७६५
रायगड - २५७
रत्नागिरी - १४५
उस्मानाबाद - १८०
बीड - १७९
औरंगाबाद - १८०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com