साहित्य संमेलनाध्यक्षपदी फ्रान्सिस दिब्रिटो

francis debrito elected sathitya samelan chief
francis debrito elected sathitya samelan chief

उस्मानाबाद - येथे जानेवारीत होणाऱ्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या उस्मानाबाद येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, ख्रिस्ती तत्त्ववेत्ते संत ऑगस्टीन, संत मदर तेरेसा; तसेच बायबलमधील वैश्विक जीवनमूल्यांवर फादर दिब्रिटो यांनी लेखन केले आहे. ‘पथिकाची नामयात्रा’ या अनुवादित पुस्तकापासून त्यांच्या लेखनाला सुरवात झाली. ‘सुबोध बायबल’ला साहित्य अकादमी पुरस्कारही जाहीर झाला आहे. 

साहित्यसेवेची दखल घेऊन साहित्य महामंडळाने अध्यक्षपद सन्मानाने दिले.  माझा मोठा सन्मान झाला आहे.
- फादर फ्रान्सिस दिब्रिटो

दहा जानेवारीपासून संमेलन
१० ते १२ जानेवारी २०२० या तीन दिवसांत हे संमेलन पार पडणार आहे. संमेलनात ग्रंथविक्रेत्यांसाठी ३५० सुसज्ज गाळे असणार आहेत. विविध कार्यक्रमांचा आराखडाही आज बैठकीत तयार करण्यात आला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com