एसटी कर्मचाऱ्यांना वारीत मोफत भोजन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

मुंबई - श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी जादा गाड्या घेऊन येणाऱ्या वाहक- चालकांसाठी एसटी महामंडळाने मोफत भोजनाची सोय केली आहे. या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीही होणार आहे. पंढरपूर येथे येणाऱ्या लाखो भाविकांसाठी राज्याच्या विविध भागांतून तीन हजार 781 जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पंढरपूर येथे तात्पुरती तीन स्थानके उभी करण्यात येणार आहेत. या स्थानकांवर बस घेऊन येणाऱ्या वाहक- चालकांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून महामंडळाच्या वतीने विशेष काळजी घेतली जात आहे. यात्राकाळामध्ये वाहक- चालकांच्या मोफत जेवणाची सोय स्थानकांवर करण्यात येणार आहे.

मुंबई - श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी जादा गाड्या घेऊन येणाऱ्या वाहक- चालकांसाठी एसटी महामंडळाने मोफत भोजनाची सोय केली आहे. या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीही होणार आहे. पंढरपूर येथे येणाऱ्या लाखो भाविकांसाठी राज्याच्या विविध भागांतून तीन हजार 781 जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पंढरपूर येथे तात्पुरती तीन स्थानके उभी करण्यात येणार आहेत. या स्थानकांवर बस घेऊन येणाऱ्या वाहक- चालकांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून महामंडळाच्या वतीने विशेष काळजी घेतली जात आहे. यात्राकाळामध्ये वाहक- चालकांच्या मोफत जेवणाची सोय स्थानकांवर करण्यात येणार आहे. कामाच्या ताणामुळे वाहक- चालकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये याची काळजी महामंडळ घेत आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाची मदत घेतली जाणार आहे. यात्राकाळातच बस स्थानकावर वाहक- चालकांची आरोग्य तपासणी होणार आहे. 

Web Title: FREE food for ST employees