जनावरांवर मोफत उपचार करणार : जानकर

सकाळ न्यूज नेटवर्क 
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाण्यामुळे जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढणार आहे. या जनावरांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची घोषणा राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. 

मुंबई : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाण्यामुळे जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढणार आहे. या जनावरांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची घोषणा राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. 

नामदार महादेव जानकर पुढे म्हणाले की, पुरामध्ये वाहून गेलेल्या मोठ्या जनावरास राज्य सरकारतर्फे 30 हजार रुपये, लहान जनावरास 16 हजार रुपये आणि शेळी/ मेंढीसाठी 3 हजार रुपये राज्य शासनातर्फे केली जाणार असल्याची माहिती नामदार महादेव जानकर यानी दिली. राज्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत 20 डॉक्‍टरांची टीम पूरग्रस्त भागात काम करत आहे. केरळमधून 10 पशुवैद्यकीय डॉक्‍टर आहोरात्र काम करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free Medical treatment on animals says Mahadev Jankar