शरद पवार म्हणतात, 'तर तुरूंगात जाण्यास तयार'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

मला तुरूंगात पाठवावं असं सरकारला वाटत असेल तर तुरूंगात जाण्याची माझी तयारी आहे.’ अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ईडीच्या कारवाई नंतर प्रतिक्रिया दिली. राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी आज अंमलबजावणी संचालयाने (ईडी)ने शरद पवार यांच्यासह विविध पक्षाच्या 70 संचालकांवर गुन्हा नोंद केला. 

मुंबई : मला तुरूंगात पाठवावं असं सरकारला वाटत असेल तर तुरूंगात जाण्याची माझी तयारी आहे.’ अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ईडीच्या कारवाई नंतर प्रतिक्रिया दिली. राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी आज अंमलबजावणी संचालयाने (ईडी)ने शरद पवार यांच्यासह विविध पक्षाच्या 70 संचालकांवर गुन्हा नोंद केला. 

अजित पवारांसह ईडीकडून 71 जणांवर गुन्हा दाखल

शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, ‘सध्या राज्यभरात माझ्या सभा मेळाव्यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद व त्यातल्या त्यात तरूणांचा सहभाग पाहता ही कारवाई झाली नसती तरच आश्चर्य वाटले असते.’अशा शब्दात पवार यांनी या कारवाईवर भाष्य केले. 

पवारांवरील कारवाईच्या निषेधार्थ उद्या बारामती बंद !

दरम्यान, शरद पवार यांच्यावर ईडी ने गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाई बाबत अधिक बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘मी कधीही या बँकेचा सदस्य अथवा संचालक नव्हतो. तरीही माझ्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असेल तर मी या संबधित यंत्रणांचे स्वागत करतो. 

पवारांवरील कारवाईच्या निषेधार्थ उद्या बारामती बंद !

सध्या राज्यात निवडणूक तोंडावर आलेली असताना अशा प्रकारची कारवाई झाली नसती तर नवल वाटले असते. कारण, आम्ही प्रचारासाठी बाहेर पडलो त्यावेळी राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेषत; युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद होता. 
ईडीच्या कारवाईत इतर काही लोक तुरूंगात गेले असतील अन् मलाही तुरुंगात पाठवण्याची या सरकारची ईच्छा असेल तर मी तुरूंगात जाण्यासाठी तयार आहे. अशा शब्दात पवार यांनी प्रतिक्रिया दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: frist reaction of Sharad pawar after ED action