राईनपाडा हत्याकांड निषेधार्थ नेवाशात मोर्चा

Front of Nevasa in protest of the Rani Pada massacre
Front of Nevasa in protest of the Rani Pada massacre

नेवासे : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा (ता. साक्री) येथे डवरी गोसावी समाजाच्या पाच भिक्षेर्यांच्या निर्घुण हत्येच्या निषेधार्ध नाथपंथी डवरी गोसावी समाज संघटनेच्यावतीने गुरुवार (ता. 5) रोजी नेवासे तहसील कार्येलायावर मोर्चा काढण्यात आला. 


या हत्याप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देवून मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांचे तत्काळ पुनर्वसन करा, त्यांच्या कुटुंबियातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी समावेश करा, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, भिक्षुकी करणार्या समाजातील व्यक्तींना शासनाचे ओळख पत्र द्या यासह आदी मागण्यासाठी नाथपंथी डवरी गोसावी समाज संघटनेच्यावतीने अध्यक्ष दयाराम सावंत, उपाध्यक्ष उत्तम सावंत, काशिनाथ चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्येलायावर मोर्चा काढण्यात आला.


नेवासे पंचायत समिती आवारातून घटनेच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चास प्रारंभ झाला. तहसील कार्येलायाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर झालेल्या निषेध सभा झाली. यावेळी समाजाचे नेते मोहन शेगर, आप्पा सावंत, पिराजी शिंदे, विठ्ठल शेगर, उत्तम शिंदे, शिवाजी शेगर यांची भाषणे झाली. 


तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार ज्योतीप्रकास जायकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील सुर्येवंशी यांनी मोर्चेकर्यांचे निवेदन स्वीकारले. मोर्चात शेकडो डवरी गोसावी समाजबांधव सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com