इंधन दरवाढीचा बारावा दिवस

यूएनआय
शनिवार, 26 मे 2018

मुंबई - देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढ शुक्रवारी सलग बाराव्या दिवशी सुरूच राहिली. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 36 पैसे; तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 22 पैसे वाढ आज झाली. दरम्यान, निती आयोगाने सर्व राज्यांनी इंधनावरील करात कपात करावी, अशी सूचना केली आहे.

देशात पेट्रोल आणि डिझेलचा सर्वाधिक दर आज अमरावतीमध्ये होता. अमरावतीत आज पेट्रोल प्रतिलिटर 86.88 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 74.33 रुपये होते. सिंधुदुर्गमध्ये आज पेट्रोल 86.67 आणि डिझेल 73.11 रुपये प्रतिलिटर होते. औरंगाबादमध्ये आज पेट्रोल 86.59 आणि डिझेल 74.22 रुपये प्रतिलिटर होता.

आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावात वाढ झाल्याने सलग बारा दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. त्याआधी कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात इंधन दरवाढ रोखण्यात आली होती. या काळात झालेला तोटा भरून काढण्यासाठी तेल कंपन्यांकडून दरवाढ सुरू आहे. यातच डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने खनिज तेलाच्या आयातीचा खर्च वाढत आहे. यामुळे पर्यायाने पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत आहे.

Web Title: fuel rate increase