खिचडी, लाडू, पराठा; कुपोषण विरोधात लढ्याचा गडचिरोली पॅटर्न

कुपोषणमुक्तीच्या या ‘गडचिरोली पॅटर्न’ची राज्यभर चर्चा सुरु आहे.
खिचडी, लाडू, पराठा; कुपोषण विरोधात लढ्याचा गडचिरोली पॅटर्न
Summary

कुपोषणमुक्तीच्या या ‘गडचिरोली पॅटर्न’ची राज्यभर चर्चा सुरु आहे.

राज्याच्या अनेक भागात बालकांमध्ये कुपोषणाची लक्षणे दिसून येतात. सरकारने वेळोवेळी याचा पाठपुरावा करुन अशा बालकांना कुपोषणापासून मुक्त करण्याऱ्या बऱ्याच योजना राबवल्या आहेत. दरम्यान, आता लहान बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातून एक वेगळी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात २ ऑक्टोबर २०२१ पासून म्हणजे जवळपास एक वर्षापासून विशेष आहार योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.

अंगणवाडी केंद्रातील ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील अतितीव्र कुपोषित, मध्यमतीव्र कुपोषित आणि तीव्र कमी वजनाच्या बालकांना कुपोषणमुक्त करण्यात आले आहे. या बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवण्यात येत आहे. त्यामुळे या काळात जिल्ह्यातील एकूण कुपोषित बालकांपैकी १० हजार ४१ कुपोषित बालकांपैकी ३ हजार १०९ बालकांना कुपोषणमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे कुपोषणमुक्तीच्या या ‘गडचिरोली पॅटर्न’ची राज्यभर चर्चा सुरु आहे.

खिचडी, लाडू, पराठा; कुपोषण विरोधात लढ्याचा गडचिरोली पॅटर्न
रिफायनरीबाबत आता निर्णय केंद्राने घ्यावा; उदय सामंत

प्रशासनाच्या या योजनेत ग्रामपंचायतीसाठी आयोगाकडून प्राप्त निधीतून नियमित दिल्या जाणाऱ्या आहाराव्यतिरिक्त दिवसातून एक वेळा विशेष आहार दिला जात आहे. यातून कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने नऊ प्रकारच्या पाककृती तयार करून बालकांना अंगणवाडी केंद्रात देण्यात येत आहेत. एकून कुपोषित बालकांपैकी जिल्ह्यात गंभीर तीव्र कुपोषित बालके १०१७, मध्यम तीव्र कुपोषित बालके ६०९४, गंभीरपणे कमी वजनाची बालके २९३० इतकी होती. परुंतु प्रशासनाने २ ऑक्टोबर २०२१ पासून विशेष आहार योजना सुरू केल्यानंतर ५ महिन्यांच्या कालावधीत बालकांचे वजन, उंची आणि आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये गंभीर तीव्र कुपोषित बालके ५०४, मध्यम तीव्र कुपोषित बालके ४३१०, गंभीरपणे कमी वजनाची बालके २११८ आढळून आली आणि कुपोषित बालकांचे प्रमाण ३१०९ संख्येने कमी झालेले आढळले.

या योजनेत कुपोषित बालकांना एकून नऊ प्रकारच्या पाककृती पुरवल्या जातात. यामध्ये शाकाहारी खिचडी, मुठे, शेंगदाण्याची पोळी, तिरंगा पुरी/पराठा, कढीपत्ता चटणी सुखी, मुंकी नट्स, लाडू, गोडलिंबाचे शंकरपाळे आणि अंकुलित कटलेट यांचा समावेश या विशेष आहाराचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात अशा प्रकारचा उपक्रम राबवणारा गडचिरोली हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. सध्या गडचिरोली पॅटर्नची जोरदार चर्चा सुरू असून या उपक्रमाची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात केली जाऊ शकते. या योजनेमुळे कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असून जिल्हा कुपोषणमुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे एक दिलासादायक चित्र दिसत आहे.

खिचडी, लाडू, पराठा; कुपोषण विरोधात लढ्याचा गडचिरोली पॅटर्न
अजित दादा काय म्हणतात त्याला काडीची किंमत नाही;गोपीचंद पडळकरांचे टीकास्त्र;पाहा व्हिडिओ

दरम्यान, याआधीही कुपोषणमुक्तीचा ‘मावळ पॅटर्न’हा मावळ व पुणे जिल्हा येथे एका क्लबकडून राबवण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या पॅटर्नचे कौतुक केले होते. २०१५-१६ या वर्षी तालुक्‍यातील कुपोषणमुक्त मावळ अभियान राबवून २३९ बालकांना कुपोषणमुक्त करण्यात या क्लबला यश आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com