गडचिरोलीत निवडणुकांसाठी हेलिकॉप्टर सेवा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

मुंबई - गडचिरोली जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी वेगवेगळ्या मतदारसंघात निवडणूक साहित्य, निवडणूक कर्मचारी पोचविणे व त्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी पोलिस कर्मचारी पोचविणे यासाठी पोलिस अधीक्षकांना 13 ते 23 फेब्रुवारी या कालावधीसाठी दोन हेलिकॉप्टर (एमआय17) व दोन बाउजर पुरविण्यात येणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय नुकताच गृह विभागाने प्रसिद्ध केला आहे. 

राज्य निवडणूक आयोगामार्फत राज्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात 16 व 21 फेब्रुवारी रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील काही परिसर अतिदुर्गम आहे. त्याचप्रमाणे, बहुतांश भाग उंच टेकड्या व जंगलव्याप्त असल्यामुळे त्या ठिकाणी वाहतुकीचे साधने अपुरी आहेत. या भागांमध्ये नक्षलवादी चळवळही सक्रिय आहे. अशा परिस्थितीत निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस अधीक्षकांना हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही हेलिकॉप्टर केंद्र सरकारकडून भाड्याने घेण्यात येणार आहेत.

Web Title: Gadchiroli elections for helicopter service